‘Human, Time, Space and Human’ : हा सिनेमा एकाच वेळी फँटसी ते भावना कोरून काढतो
भुकेभोवती फिरणारी ही कथा शेवटपर्यंत खिळवून ठेवते. हा सिनेमा एकाच वेळी हॉलमधल्या लोकांच्या डोळ्यात प्रेम, कारुण्य, संताप, तर भविष्यात ओढवू शकणाऱ्या परिस्थितीवर अंजन घालतो. स्पेस ही एक फँटसी सोडली तर या सिनेमात अनेक छोट्या-मोठ्या फँटसी पुढे येत राहतात. जसं बोटीवर तळाशी झाडं लावणं, अंडी, कोंबड्या पाळणं, हे करणारी वृद्ध व्यक्ती. तोही एक फँटसी वाटत राहतो.......